सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
हडपसर ते नीरा दरम्यानच्या पालखी मार्गाची पाहणी करून तेथील स्थानिक समस्या समजावून घेऊन घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच यंदा चांगल्या पद्धतीने पालखी सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुरंदर तालुक्यातील पालखी स्थळांची पाहणी केली. त्यावेळी नीरा येथील पालखी तळाची पाहणी करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद, पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पालखी सोहळा प्रमुख अँड.विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, दौंंड - पुरंदरचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, भोर - पुरंदरचे डीवायएसपी धनंजय पाटील, गटविकास अधिकारी अमर माने, एनएचआयचे अधिकारी अभिजित आवटे, जेजुरीचे पिआय उमेश तावस्कर, नीरेचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, दत्ताआबा चव्हाण, विराज काकडे आदी उपस्थित होते.