सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
गंगावळण गावच्या वैभवात ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडी इमारतीमुळे भर पडणार आहे. विकास कामांचे बाबतीत गंगावळण गाव हे अग्रभागी राहील, असे गौरवोद्गार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर तालुका कोअर कमिटीचे प्रमुख व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी गंगावळण येथे शुक्रवारी (दि.12) काढले.
गंगावळण ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन इमारतीचे (रु. 15 लाख) व अंगणवाडी इमारतीचे (रु. 10 लाख) भूमिपूजन राजवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी त्यांनी वरील गौरवोद्गार काढले.
ते म्हणाले, पुणे जिल्हा नियोजन विकास मंडळातून या दोन्ही कामांसाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून सदरच्या कामांसाठी एकूण रु. 25 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयासाठी गरज पडल्यास वाढीव निधी दिला जाईल. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार गतिमान निर्णय घेत असून, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे याप्रसंगी राजवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी गंगावळण ग्रा.पं.च्या सरपंच निकिता गलांडे, भारतीय जनता पार्टी युवा वॉरियर्स पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक प्रशांत गलांडे, उपसरपंच अभिजीत नलावडे, गंगावळणचे पोलीस पाटील विनोद महारुद्र पाटील, विविध कार्यकारी सोसायटी गंगावळणचे चेअरमन नितीन पवार, ग्रामपंचायत सदस्या उज्वला जगताप, ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाषतात्या गलांडे, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
____________________________