सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात विनापरवाना शस्र (कोयता, चॉपर) जवळ बाळगून दहशत पसरवणाऱ्या एका इसमा विरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून अटक करीत शस्त्र बाळगणाऱ्यास भोर पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक भोर शहर परिसरात गुरुवार दि.११ पेट्रोलिंग करत असताना पथकाला एक इसम धारदार शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.भोर शहरातील रामबाग चौक येथे इसम अनिकेत विलास सुकाळे वय-२४ वर्ष रा.कांबरे ता.भोर हा त्याच्या ताब्यात विनापरवाना चॉपर/कोयत्या सारखे धारधार शस्र बाळगून होता.त्वरित गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चॉपर/कोयता मिळून आला.सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध शस्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी भोर पोलिसांच्या ताब्यात दिले.ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई प्रदीप चौधरी,पो. ना.अमोल शेडगे, बाळासाहेब खडके,मंगेश भगत यांनी केली.भोर पोलीसंनी बेकायदा शस्त्र बाळगणारास न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला एरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
COMMENTS