नीरा ज्युबिलंटने खत प्रकल्प बंद करावा अन्यथा.... कायदेशीर कारवाईचा इशारा : निंबुत ग्रामपंचायतीने दिले पत्र

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत (ता. बारामती) गावच्या हद्दीतील जुबिलंट कंपनीच्या खत प्रकल्पामुळे निंबुत व परिसरातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या खत कंपनीमध्ये उसाच्या कच्च्या मटेरियल पासून खत निर्मिती केली जाते त्यामुळे या भागामध्ये मच्छर, माशा, अशा विविध प्रकारचे कीटक तयार होत आहेत व या कीटकांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून खत प्रकल्प बंद करण्याची मागणी निंबुत ग्रामपंचायतीने कंपनीकडे पत्राद्वारे केली आहे. कायदेशीर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे. शिवाय यावर आठ दिवसांत लेखी उत्तर देण्याची मागणी केली आहे. निंबुतच्या सरपंच निर्मला काळे यांच्या वतीने जुबिलंट कंपनीस पत्र देण्यात आले आहे. निरा- बारामती मार्गावर खत प्रकल्पातून रस्त्यावर वारंवार मळी पडते यातून वाहने घसरत अनेकदा अपघात झाले आहेत. 

        ग्रामपंचायतीच्या पत्रावर कंपनी प्रशासन काय निर्णय घेते याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.  नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता खत प्रकल्प बंद करणार का ? ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवणार हे लवकरच समजणार आहे. या खत प्रकल्पामुळे निरा बारामती रस्त्याची दुरावस्था होत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. उग्र वासाने येणारे- जाणारे नागरीक हैराण झाले आहेत. निंबुत नजीक लक्ष्मीनगर आनंदनगर, बी.जी.काकडे वस्ती, गावठाण परीसरातील नागरीकांना डेंग्यू, मलेरिया, तसेच साथीच्या आजाराने ग्रस्त नागरिक आहेत. उपजीविकेचे साधन असलेली निरा नदीतील मासेमारीही धोकादायक आली आहे. मासेमारी करण्यासाठी निरा नदी पात्रात गेल्यास मोठ्या प्रमाणात मृत मासे सापडत आहेत. विविध कारणांमुळे कंपनी चर्चेत असते. मात्र ग्रामस्थांच्या जीवाला धोका असूनही कंपनी प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. 
---------------------
कंपनीकडून या ठिकाणी नेहमी फॉगिंग केले जाते. नुकतेच २२ एप्रिल व ५ मी रोजी फॉगिंग करण्यात आले होते. स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. 
इसाक मुजावर
जनसंपर्क अधिकारी
To Top