सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिचा विवाह लावून देणे दोन्ही कडील मंडळीला चांगलेच महागात पडले असून राजगड पोलिसांनी कारवाई करत नवरदेव व अल्पवयीन नवरी मुलगी यांचे आई-वडील व नातेवाईक आशा १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम रामचंद्र राजीवडे वय २३ रा. हारपुड ता. वेल्हा या तरुणासोबत मुळशी तालुक्यातील गावातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह रविवार दि.७ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माळेगाव ता.भोर शिवशंभो मंगल कार्यालय येथे पार पडला.मुलगी अल्पवयीन माहीत असतानाही दोन्हीकडचे आई-वडील व नातेवाईक यांनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावत असल्याबाबत राजगड पोलीस ठाण्यात निनावी फोन आल्यानंतर पोलीस शिपाई सचिन नरुटे,मंगेश कुंभार,प्रशांत राउत यांनी मंगल कार्यालयात जाऊन व नवरी मुलीचे जन्म तारीखची शहानिशा केली असता मुलगी ही १७ वर्ष ८ महिने २१ दिवस असल्याचे निष्पन्न झाले.हा गुन्हा असल्याचे संबधीतांना सांगुन राजगड पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई सचिन नरुटे यांनी फिर्याद दिली आहे.
याविवाह प्रकरणी नवरा मुलगा शुभम रामचंद्र राजीवडे,रामचंद्र निवृत्ती राजीवडे ( वडिल), सिता रामचंद्र राजीवडे ( आई) रा. हारपुड ( ता. वेल्हा ) मामा अनिल रामभाउ रेणुसे, मामी वैशाली अनिल रेणुसे, आकाश सुनिल राजीवडे, अभिषेख रविंद्र चव्हाण, कुणाल मधुकर शिरोळे, चैतन्य रामचंद्र राजीवडे, शंतनु शिवाजी पवार, कुशाल मधुकर शिरोळे व लग्न लावणारे ब्राम्हण सुनीलकाका खासनीस तसेच अल्पवयीन मुलीचे आई, वडिल, मामा, मामी व इतर नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्वांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना नोटीस देण्यात आली आहे तर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तीच्या आई -वडीलांकडे सोपवण्यात आल्याची माहीती तपास अधिकारी पोलिस फौजदार संजय सुतनासे यांनी दिली.