बारामती ! को-हाळे-मुढाळे रस्त्यावर चारचाकी व दुचाकीच्या अपघातात पुरंदर तालुक्यातील मावडी कप चा तरुण ठार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुढाळे ते कोऱ्हाळे बुद्रुक रोडवर आज दुपारी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. मयूर जालिंदर जगताप (वय:26) रा. मावडी क.प, ता : पुरंदर असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
           सविस्तर हकीकत अशी की, आज दुपारी दोनच्या सुमारास मुडाळे खिंड येथे मुढाळेकडून कोऱ्हाळे बुद्रुकच्या दिशेने निघालेली स्विफ्ट डिझायर गाडी व विरुद्ध बाजूने आलेली दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील युवकाचा जागीच मृत्यू झाला तर चार चाकी कार खिंडीतील भराव्यावरून खाली कोसळली. काही वेळातच वडगाव निंबाळकर पोलिसांनी अपघात स्थळी दाखल होत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाला उत्तरणीय तपासणीसाठी बारामतीतील सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. मात्र रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. 
-------------
विवाहाला एक वर्ष पूर्ण होत नाही तरच नियतीचा घाला....
मयूर हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो घरातील एकमेव करता मुलगा होता. त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तरच नियतीने त्याच्यावर घाला घातला. मात्र मयूरच्या अशा अकाली जाण्याने माऊडी क.प. गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
To Top