सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
शासन आपल्या दारी अंतर्गत भोर उपविभागातील भोर आणि वेल्हे तालुक्यात मंगळवार दि.३० मे रोजी विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
यात भोरला गंगोत्री हॉल, नसरापूर येथे कुंभारकर लॉन्स तर वेल्ह्यात पानशेत,विंझर,आंबावणे या ठिकाणी एकत्रित शिबिर आयोजित करण्यात आले होते.विविध राज्य शासकीय व केंद्र शासनाचे विभाग मिळून एकूण ३७ हजार १७ सेवांचे वाटप करण्यात आले.
वेल्हे तालुक्याचे शिबिर दोन टप्प्यात घेण्यात आलेले असून यामध्ये पानशेत मंडळात एकूण २६०५ सेवा व उर्वरित वेल्हे विंजर आणि अंबवणे महसूल मंडळात एकूण ५९७० सेवा अशा एकूण ८५७५ सेवा निर्गमित करण्यात आलेले आहेत.संपूर्ण शासन आपल्या दारी शिबिर कालावधीमध्ये भोर तालुक्यात २८ हजार ४४२ तर वेल्हे तालुक्यात ८ हजार ५७५ असे एकूण ३७ हजार १७ सेवा देण्यात आली. वरील ठिकाणी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे ( सारथी ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी ) यांची एकूण ४ हजार ७०० इतक्या संदर्भ साहित्याची /पुस्तकांची विक्री झाली आहे.
अभियानासाठी सर्व विभाग प्रमुखांनी चांगला प्रतिसाद दिला असून १३ एप्रिल पासून यंत्रणा काम करत होती.यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी किरण धनवडे,नायब तहसीलदार मनोहर पाटील, अजिनाथ गाजरे तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.