जावली ! धनंजय गोरे ! श्वेता मर्ढेकरने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात मिळविली मास्टर्स डिग्री : हा बहुमान मिळवणारी श्वेता जावली तालुक्यातील पहिलीच

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी 
जावळी तालुक्यातील जवळवाडी गावच्या सरपंच सुरेखा मर्ढेकर व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक सतीश मर्ढेकर यांची कन्या श्वेता सतीश मर्ढेकर हिने अमेरिका येथील नामांकित टेक्सास युनिव्हर्सिटी मध्ये Management & Information टेकनॉलॉजि यामध्ये मास्टर डिग्री विशेष प्रविण्य मिळवून उत्तीर्ण झाली. याबद्दल तिचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.
           जावळी तालुक्यातील दुर्गम भागातून अमेरिका येथील नामांकित विद्यापीठात मास्टर डिग्री मिळणारी श्वेता ही पहिलीच मुलगी आहे. तिचे पहिली ते दहावी चे शिक्षण शानबाग विद्यालय सातारा, ११-१२ चे शिक्षण यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा, कॉम्प्युटर इंजिनीरिंगचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले.
    कु . श्वेताच्या या यशाबद्दल ,सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेण्णा निरंजना पतसंस्था चेअरमन  शंकरराव मर्ढेकर, व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
To Top