Bhor Breaking ! खेड-शिवापूर टोल नाक्यावर स्थानिक टोळक्याकडून जेष्ठ प्रवाशाला मारहाण : राजगड पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----  
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावर गाडी ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ कारणावरून ज्येष्ठ प्रवाशाला मारहाण करण्यात आले असल्याची घटना घडली असल्याने प्रवासी वाहन चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
     पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका परीसरात गुंडगिरीचे प्रमाण वाढले असून किरकोळ कारणावरून स्थानिक परिसरातील तरुणांच्या टोळक्यांकडून गाडी ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ कारणावरून प्रवाशांना मारहाण करण्यात आली. केवळ गाडी ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ कारणावरून शुक्रवार दिं.२३ प्रवास करणाऱ्या जेष्ठ व्यक्तीला खेड-शिवापूर टोल नाक्यावर दोन जणांनी गाडी अडवून मारहाण करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी राजगड पोलिसांनी नितीन कोंडे आणि सूरज कोंडे दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.या प्रकारांमुळे पुणे-सातारा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये असुरक्षितता असल्याचे चित्र आहे. तर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. टोल नाक्यावर अशा प्रकारचा उच्छाद मांडणाऱ्या टोळक्यांवर तात्काळ पोलिसांनी कारवाई करन्याची मागणी प्रवासी वाहन चालकांकडून होत आहे.
To Top