सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि २ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषय निहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.
--------------------
या संकेतस्थळावर पाहू शकता निकाल------
www.mahresult.nic.in
http://ssc result.mkcl.org https://ssc.mahresults.org. in