सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) वतीने देण्यात येणारा सन 2018 - 19 या वर्षाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार .प्रताप साहेबराव धापटे यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते मुंबई येथे एका समारंभामध्ये प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर -म्हैसेकर , सचिव (रस्ते) साळुंखे साहेब, सचिव (बांधकाम), दशपुते , मुख्य अभियंता अतुल चव्हाण, रणजीत हांडे , अधीक्षक अभियंता बहिर , मुख्य वास्तुशास्त्रज्ञ देशपांडे, सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचारी व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांच्या वतीने, प्रताप धापटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रताप धापटे कोर्हाळे बुद्रुक बारामती, येथील रहिवाशी असून, त्यांचे वडील स्व.साहेबराव अण्णा धापटे हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. धापटे यांना समाजसेवेचा वसा घरातूनच मिळाला आहे. बांधकाम विभागांमध्ये काम करीत असताना पुणे जिल्ह्याचा २००१ ते २०२१ या वीस वर्षाचा रस्ते विकास आराखडा तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पंचक्रोशीतील रस्ते आराखड्यामध्ये समावेश करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष म्हणूनही शासनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी पतसंस्थेमध्ये सलग १८ वर्ष काम करीत असताना ७ वर्ष संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सार्वजनिक बांधकाम विभागात सेंट्रल बिल्डिंगला काम करत असताना ग्रामीण भागातील लोकांना त्यांचा मोठा आधार होता..पंचक्रोशीतील अनेक गोरगरीब रुग्णांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे.
COMMENTS