सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याचे दक्षिणेकडील दुर्गम डोंगरी आंबवडे खोऱ्यातील टिटेघर, कोर्ले, पान्हवळ,आंबवडे ता.भोर येथील आठ ते दहा बंद घरे चोरट्यांनी शुक्रवार दि.१० पहाटे कडी-कोयंडे तोडून फोडली असून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
भोर तालुक्यातील बहुतांशी नागरिक नोकरी तसेच धंद्यासाठी मुंबई,पुणे येथे वास्तव्यास असल्याने गावाकडची घरे बंद अवस्थेत असतात.चोरट्यांनी घरे बंद असल्याचा फायदा घेत शुक्रवारी रात्री बंद घरे फोडली.बंद घरे फोडून चोरी झालेल्या घटनेची तात्काळ माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे,हवालदार उद्धव गायकवाड,विकास लगस, दत्तात्रय खेंगरे,राहुल मखरे घटनास्थळी पोहचून माहिती घेतली.मात्र घरफोड्या झालेले घर मालक हे मुंबई ,पुणे येथे असल्याने रोख रक्कम व सोन्याचा ऐवज असे एकूण किती किमतीची चोरी झाली याची नोंद झालेली नाही.नागरिकांनी बंद घरांमध्ये किमती वस्तू,सोने,पैसे ठेवू नयेत,दक्ष रहावे असे आवाहन भोर पोलिसांकडून करण्यात आले आहे.