सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता. बारामती येथे बारामतीच्या दिशेने निरेकडे निघालेल्या एका महिला दुचाकीस्वारास ट्रक ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने महिला गंभीर जखमीरित्या झाली आहे.
अपघातानंतर ट्रक शेजारील उसाच्या शेतात शिरला. नीरा-बारामती रस्त्यावर दुपारी सव्वातीनच्या सुमारास हॉटेल संदीप खानावळ समोर ही घटना घडली. जखमी महिला अश्विनी घोरपडे वय 32 रा. पाडेगाव फलटण यांना उपचारासाठी साईसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शेलार करत आहेत.
COMMENTS