फलटण ! येथील नीरा उजव्या कालव्यात बुडून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण - हेमंत गडकरी
फलटण शहरातून वाहणाऱ्या नीरा उजव्या कालव्यात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. निसर्ग सूर्याजी जगताप असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. 
    मयत निसर्ग सूर्याजी जगताप ( वय. १३ ) हा उपळवे ( ता. फलटण ) या गावात राहतो. त्याचे चुलते शैलेश जगताप हे फलटण शहरात राहतात. दिनांक ६ जून रोजी दुपारी चुलते व चुलत भाऊ यांच्या सोबत फलटण येथील नीरा उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता मात्र प्रवाहाच्या वेगाने त्याचा हात सुटल्याने तो प्रवाहात वाहत गेला.   दरम्यान दोन दिवस त्याच्या मृतदेहाचा शोध कुटुंबीय घेत होते. बरड जवळ या निष्पाप बालकाचा मृतदेह सापडला. 
    उपळवे या त्याच्या मूळगावी बौद्ध धम्माच्या परंपरेनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोऱ्हाळे बुद्रुक हे निसर्ग याचे आजोळ होते. निसर्ग पांडुरंग सयाजी चव्हाण यांचा नातू तर संदेश चव्हाण यांचा भाचा होता. निसर्गच्या अकाली जाण्याने त्याचे गाव असलेल्या उपळवे व . कोऱ्हाळे बुद्रुक येथे शोककळा पसरली आहे.
To Top