मेढा ! पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज : अमित कदम

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा - प्रतिनिधी 
बहुजन समाजामध्ये जाती जाती मध्ये तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रकार सुरु झालेला आहे. त्यापासून सावध राहाले पाहिजे. युवक वर्ग त्यामध्ये भरडला जात असून त्यासाठी बुथ कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक गांवात घराघरात   प्रबोधन करण्याची गरज आहे. त्याच बरोबर तालुक्यात पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे असे मत  सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमितदादा कदम यांनी व्यक्त केले.
        राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांचे सुचनेनुसार , आ . शशिकांतजी शिंदे   यांचे नेतृत्वाखाली जावली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून "एक दिवस पक्षासाठी " अभियानाचा शुभारंभ , तसेच गांव निहाय बुथ कमिट्या निवडणे व पक्ष वाढी संदर्भात विचार विनिमय करणेसाठी आज शुक्रवार दि. ९ जुन रोजी मेढा विकास सोसायटीच्या " सहकार भवन  सभागृहात  सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थीतांना मार्गदर्शन करताना अमितदादा कदम बोलत होते.
        यावेळी  बोलताना अमितदादा कदम  पूढे म्हणाले , आता विचाराची लढाई सुरु झाली आहे. ती विचारानेच लढली पाहीजे. संघटनात्मक काम करुन पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न कर०याची गरज आहे . मतदार संघ हा पक्षाचा आणि तेथील जनतेचा असतो. मी म्हणजे पक्ष व मी म्हणजे विकास म्हणणाऱ्यांना बाजुला बकेले पाहिजे नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही. तक्तालीन आमदारांनी पक्षवाढीसाठी व कार्यकत्यांना ताकद दे०याचा कधीच प्रयत्न केला नाही .पक्षापेक्षा स्वतःच्या विचाराचा कार्यकर्ता कसा निर्माण होईल याचा प्रयत्न केला. काही उपद्रवी लोकांच्यामुळे पिढयानपिढयांच घर मला सोडाव लागल. पण पुन्हा मी मुळ प्रवाहात आलो आहे. मी काही मिळवण्यासाठी पक्षात आलो नाहीतर श्रेष्ठींच्या आदेशानुसार पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे कुणाचाही गैरसमज असेल तर तो त्यांनी दुर करावा असे सुचित केले.
     प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते पक्षाचा वर्धापन दिन  केक  कापून साजरा करण्यात आला. या प्रसगी सातारा जावली विधान सभेचे अध्यक्ष शशिकांत वाईकर, तालुका महिला अध्यक्षा रुपालीताई भिसे , युवक अध्यक्ष अतिष कदम,जावली बँकेचे योगेश गोळे, नारायण शिंगटे, साधू चिकणे , मंदा भिलारे , अशोक चिकणे , विकास मोहिते ,यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी प्रतापगड कारखान्याचे संचालक आनंदराव जुनघरे , जावली बँकेचे प्रकाश कोकरे , चंद्रकांत गवळी, प्रकाश कदम , अरविंद जवळ मधुकर शेलार , संदिप पवार ,आनंदा कांबळे , मोहन देशमुख,,  रोहीत रोकडे ,, राजाराम गोगावले, सुरेश दळवी, पुंडलीक पार्टे, विठ्ठल पवार ,तुकाराम धनावडे , प्रशांत दळवी, सुंदर भालेराव , विश्वास दुंदळे ,. विलास दुंदळे, निवृत्ती मोरे, प्रविण गुजर, एकनाथ तरडे , मारुती मोरे,वसंत तरडे इत्यादी मान्यवरांसह तालुक्यातुन असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
     प्रारंभी सुरेश पार्टे यांनी उपस्थितांचे स्वागत करून , प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले तर आभार प्रमोद पवार यांनी मानले.
-----------
भारतीय लोकशाही अउचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 जातीय दंगली घडविण्याचे षडयंत्र सुरु आहे.
आ. शशिकांतजी शिंदे , दिपक पवार, सुहास गिरी व आजी , माजी पदाधिकारी , कार्यकर्ते यांना बरोबर घेवून पक्ष संघटना वाढविणार - अमितदादा कदम
गटतट हे पक्षाला घातक असून यातून कोणाचाच फायदा होणार नाही.

To Top