सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा - ओंकार साखरे
जावली तालुक्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जावली ( मेढा ) अंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनिस यांच्या रिक्त पदांची भरती चे आयोजन करण्यात आले आहे . अशी माहिती प्रकल्पाधिकारी श्रीमती मानसी संकपाळ यांनी दिली.
मेढा बीट मध्ये -मामुर्डी , रिटकवली-, दिवदेव-, केळघर बीट मध्ये - आंबेघर-, बाहुळे-, बोंडारवाडी-, भेगावली , केडंबे, केळघर, मुकवली, वरोशी, कुसुंबी बीट मध्ये - बामणवाडी, धनकवडी, गोंदेमाळ, म्हाते बु॥ , भामघर , बामणोली बीट मध्ये- अंधारी , कास , उंबरीवाडी , निपाणी . , फुरुस, ( मिनी अंगणवाडी सेविका), सायगांव बीट मध्ये - नरफदेव , धनगरपेढा, दरे बीटमध्ये - सरताळे . , काळेवाडी , भिवडी , पानस पु., कुडाळ बीट मध्ये - म्हसवे , म्हसवे गावठाण, बामणोली गावठाण, हुमगांव, हातगेघर बीट मध्ये वहागाव , महू पानस आखेगणी , टोणपेवाडी, करहर बीटमध्ये - बेलोशी , शिंदेवाडी , सुलेवाडी ,इत्यादी अंगणवाड्यामध्ये मदतनिस व १ मिनी अंगणवाडी साठी सेविका भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या साठी शैक्षणिक पात्रता १२ वी पास असून , १८ ते ३५ वर्षाची वयोमर्यादा असून विधवा महिलांसाठी ४० वर्षाची वयो मर्यादा ठेवण्यात आली आहे. अर्जदार महिला त्याच महसुली गांवची रहिवाशी असावी. १२ ते २६ जुन २०२३ अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख असून अर्ज मिळण्याचे व स्विकारण्याचे ठिकाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जावली। ( मेढा) हे असून पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती मानसी संकपाळ यांनी केले आहे.