सुपे परगणा ! विश्वास पवार यांचा सेवापुर्तीनिमित्ताने सपत्निक सत्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी येथील विश्वास रामचंद्र पवार यांची मैलमजुर म्हणुन ४० वर्षाची सेवापुर्ती झाल्याबद्दल दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सपत्निक सत्कार करण्यात आला. 

      दौंड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंडचे उपअभियंता एच. एन. माळशिकारे होते. यावेळी विश्वास पवार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. 

          पवार यांच्या सारखा प्रामाणिक व अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्त होणे हे बांधकाम विभागासाठी नुकसानकारक आहे. या पुढील काळात बांधकाम विभागातील सेवानिवृत्ती कार्यालयीन कागदपत्रातील कामकाजात कोणतीही अडचण येऊन देणार नसल्याचे दौंडचे उपअभियंता माळशिकारे यांनी सांगितले. 

         याप्रसंगी बाजार समितीचे संचालक विशाल भोंडवे, माजी सभापती दिलीप खैरे, पोपट खैरे, सूर्यकांत खैरे, सहाय्यक अभियंता एम. आर. सोनवणे, शाखा अभियंता एम. आर. खबिले, वरिष्ठ लिपिक सचिन घोंगडे, अभियांत्रिकी सहाय्यक आर. डी. वाघ, आदींसह ग्रामस्थ, नातेवाईक व पदाधिकारी उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदिप पवार यांनी केले, सुत्रसंचालन शरद मचाले यांनी केले. तर आभार धनंजय पवार यांनी मानले.
To Top