सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीच्या सातव चौकात वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात महागात पडले असून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
भर दुपारी दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे. याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी सातव चौकात केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला.
त्या ठिकाणी अनेक मुले जमा झाल्याने लोकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तात्काळ पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन राहुल राजेंद्र मदने वर्ष राहणार प्रगती नगर बारामती जिल्हा पुणे,.विकास नानासो चंदनशिवे वय वर्ष राहणार मळद तालुका बारामती जिल्हा पुणे, अक्षय भीमराव कांबळे वय 26 वर्ष रा आमराई बस स्टॅन्ड समोर बारामती जिल्हा पुणे, सागर रमेश आटोळे 29 रा कसबा चांदणी चौक बारामती जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी वरील सर्वांच्यावर भादवि कलम 143 147 149 504 506 व क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलेले आहे.
COMMENTS