वाई ! हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन दरोडा टाकणा-या टोळीस अटक : स्थानिक गुन्हे शाखा, वाई व भुईंज पोलिसांची संयुक्त कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 वाई  : प्रतिनिधी 
१ जुन २०२३ रोजी दुपारी ०१.१५ वाजणेचे सुमारास पोलीस अभिलेखावरील आरोपीचे
साथीदारांनी मेनवली, ता. वाई जि. सातारा येथील एका हॉटेल व्यवसाईकास पिस्तुल रोखुन त्याचेकडे १० लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करुन त्यास जीवे ठार मारण्याची धमकी देवुन त्याच्या गळयातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जबरीने ओढुन चोरी करुन त्यास धक्काबुक्की व मारहान केली होती वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन वाई पोलीस ठाणे गु.र.नं ४२५/२०२३, भादवि कलम ३९७, ३८५, ३८६, ३८७, १२० (ब) सह आर्म अॅक्ट कलम ३,२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक श्री. अरुन देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. अजय कोकाटे, परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक सातारा यांना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संतोष पवार, सपोनि रविंद्र भोरे, पोउनि विश्वास शिंगाडे पोउनि अमित पाटील यांचे अधिपत्याखाली वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तपास पथकांनी सर्वप्रथम घटणाठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करुन घटनाठिकाणचे साथीदार यांचेकडे विचारपुस करुन सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करुन तसेच तांत्रीक विश्लेषन करुन गुन्हयातील आरोपींना निष्पन्न केले. त्यानंतर नमुद आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच भुईज व वाई पोलीस ठाणेकडील अंमलदार यांचे मदतीने भुईंज, वाई, पुणे या ठिकाणहुन शोध घेवुन गुन्हयातील ११ आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासुन अत्यंत अल्प कालावधीत ताब्यात घेवुन नमुद गुंन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे करीत आहेत. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापु बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, कमलेश मीना, परि. पोलीस अधीक्षक सातारा, बाळासाहेब भालचिम, उप-विभागीय पोलीस अधिकारी वाई यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई, श्री. अजय कोकाटे, परिविक्षाधीन पोलीस उप-अधीक्षक सातारा यांचे अधिपत्याखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि श्री. संतोष पवार, सपोनि रविंद्र भोरे, पोलीस उप-निरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा व भुईंज व वाई पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

वाई पोलीस ठाणे गु.र.नं. ४२५/२०२३ भादवि कलम ३९७, ३८५, ३८६, ३८७, १२० (ब) सह आर्म अॅक्ट कलम ३,२५ मधिल आरोपींची माहीती-

१) अनिकेत ऊर्फ बंटी जाधव रा. भुईज ता. वाई जि. सातारा

२) निखिल शिवाजी मोरे रा. गंगापूरी, वाई ता. वाई जि. सातारा

३) अभिजीत शिवाजी मोरे रा. गंगापूरी, वाई ता. वाई जि. सातारा.

४) आरिफ सिकंदर मुल्ला वय ४३ वर्षे धंदा चालक रा. भुईंज ता. वाई

५) सागर तुकाराम मोरे वय ३४ वर्षे धंदा वेटर रा. भुईंज ता. वाई

६) अभिमन्यू शामराव निंबाळकर वय २५ वर्षे रा. भुईंज ता. वाई

७) सुरज मुन्न शेख वय २१ वर्षे धंदा- चिकन सेंन्टर रा . भुईंज ता. वाई

८) संदिप सुरेश पवार वय २३ वर्षे धंदा-मजूरी रा. भुईंज ता. वाई

९) क्षितीज ऊर्फ सोन्या विरसेन जाधव वय १९ वर्षे धंदा-शिक्षण रा. भुईंज ता. वाई

१०) गिरिष दिलीप गवळी वय २५ वर्षे धंदा-हॉटेल रा. भुईंज ता. वाई

११) प्रज्वल बाळकृष्ण पवार वय २३ वर्षे धंदा-सिक्यूरीटी गार्ड रा. भुईंज ता. वाई

१२) प्रतिक प्रकाश सुर्यवंशी वय २८ वर्षे धंदा-हॉटेल रा. भुईंज ता. वाई

१३) अमोल महामुलकर रा. महामुलकरवाडी, भुईज ता. वाई

१४) रत्नाकर मधूकर क्षीरसागर वय २८ वर्षे धंदा चालक रा. भुईंज ता. वाई

१५) निलेश उमेश मोरे वय २५ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. भुईंज ता. वाई
To Top