सोमेश्वर रिपोर्टर टीम--- -
भोर : संतोष म्हस्के
पुणे - सातारा महामार्गावर वरवे ता.भोर येथे एसटी बस व कंटेनरच्या विचित्र अपघात झाल्याची घटना घडली असून ४ वाहने एकमेकांना धडकल्याने एसटी बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
अपघातात २ कंटेनर व २ बसचा समावेश असून खाजगी बस पलटी झाल्याने ४ जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी झाले आहेत .यातील ४ जण गंभीर जखमी असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला एका एसटी बसने मागून जोराची धडक दिली.या धडकेत एसटी बस उलटली गेली यामुळे बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत.तसेच यावेळी एक कार देखील कंटेनरला मागून धडकली.मात्र कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत.दरम्यान सातारा रस्त्यावरील या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.अपघाताचे गंभीर स्वरूप पाहता अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.