बारामती ! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बारामतीत वृक्षारोपण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताचे औचित्य साधून बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले. पक्षाच्या विविध सेलच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
       ओंकार गायकवाड मित्र मंडलाच्या वतीने शहराच्या वसंतनगर परिसरात शहराध्यक्ष जय पाटील, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव, महिलाध्यक्षा अनिताताई गायकवाड, सामाजिक न्याय विभागाच्या रेश्माताई ढोबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
To Top