सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू आणि माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ऋषिकांत शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यासह जावली तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काल सायंकाळी आमदार शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील आमदारांवर टीकेची तोफ डागली असतानाच खुद्द त्यांच्या भावाने शिवसेनेत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, झोपडपट्टी पुनर्वसन विकास राज्यमंत्री दर्जा विजय नाहटा, वाशी, नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख नगरसेवक किशोर पाटकर तसेच घनसोली विभागातील ऋषिकांत शिंदे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.