मेढा ! शहराच्या प्रस्तावित विकास आराखडयाला स्थगिती द्या : खा. श्रीनिवास पाटील यांना साकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी 
मेढा नगरपंचायतीच्या वतीने प्रस्तावित केलेल्या नियोजीत विकास आराखड्याला स्थगिती मिळावी याबाबतचे निवेदन खा. श्रीनिवास पाटील यांना दे०यात आले. 
        मेढा शहराचा विकास आराखडा  हा येथील शेतकरी , व्यापारी, रहिवाशी यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. तर काही शेतकरी भूमीहीन  होत आहेत. त्यामुळे खा. श्रीनिवास पाटील यांनी शासन दरबारी लक्ष घालून हा अन्यायकारक विकास आराखडा कसा रद्द होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती यावेळी त्यांना करण्यात आली. 
       राष्ट्रवादीचे नेते अमितदादा  कदम यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशी शेतकरी बचाव संघाचे वतीने हे निवेदन खा . श्रीनिवास पाटील यांना देण्यात आले असून संबधीत विभागाचे मंत्री , अधिकारी यांच्याशी बोलून आपला प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी  यावेळी दिले .
        दरम्यान माजी जलसंपदा मंत्री ,विधान परिषदेचे आमदार शशिकांतजी शिंदे यांनाही रहिवाशी शेतकरी बचाव संघाचे वतीने बाधीत शेतकऱ्यांच्या व्यथाचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी रहिवाशी शेतकरी बचाव संघाचे सुरेश पार्टे, प्रकाश कदम , किसन जवळ, आनंदा कांबळे , संदीप पवार , इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.

To Top