सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
"पालखी सोहळा पुढील आठवड्यात होत आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त आहे. पालखी मार्गावर सावलीची व्यवस्था करण्यात येत आहे. शासनाच्या दोन बैठका व तीन दौरे झाले आहेत. तयारी चालू आहे. राहिलेल्या कामाची पाहणी करण्याचं काम सध्या चालू आहे. वारीत शासनाला फारसा हस्तक्षेप करता येत नाही. वारीमध्ये भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यासाठी शासनाला आणखी व्यवस्था करावी लागणार आहे." महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गाची पाहणी व मुक्काम, विसाव्याचा ठिकणची वारकरी व्यवस्था नियोजन दौरा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज गुरवारी केला. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख अँड. विकास ढगे पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुरंदरचे आ. संजय जगताप, माणचे आमदार जयकुमार गोरे, पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, साताराचे नुतन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, साताराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक बापू बांगर, दौंड- पुरंदरचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, भोर - पुरंदरचे डीवायएसपी तानाजी बरडे, पुणे जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, पुरंदरचे प्रभारी तहसिलदार दत्तात्रय गवारी, सातारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, वाई - खंडाळ्याचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव , फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप ,फलटणचे डीवायएसपी राहुल धस, खंडाळ्याचे प्रभारी तहसिलदार चेतन मोरे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, विराज काकडे, सचिन लंबाते, योगेंद्र माने, सुरेंद्र जेधे यांच्यासह महसुल, पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी, विसावा स्थळ व मुक्कामाच्या ठिकाणांची पाहणी करत सोहळा निर्विघ्नपणे पारपडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली. यावेळी दौंज, वाल्हे, पिसुर्टी, पुणे मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग बाबत असलेल्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात असे निवेदन ग्रामस्थंनी दिले.