सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील बावधन येथील वाघजाईवाडी परिसरात रायवळ जातीच्या लाकुडमालाची विनापरवाना वाहतुक होत असलेची माहिती समजताच वनविभाग वाईच्या पथकाने जागेवर जावुन पाहणी केली असता सविता बाळकृष्ण दगडे,व महेश दादासो वाघमारे हे आरोपी लिंब,वारस जातीचा लाकुडमाल 16.32 घ.मी.टाटा कंपनीच्या MH 46 F 2876 टेम्पोमधून विनापासी विनापरवाना वाहतुक करीत असताना आढळून आले.
सदरचा टेम्पो लाकुडमालासह जप्त करून वनक्षेत्रपाल वाई कार्यालयाच्या आवारात आणून लावला.व सदर गुन्हेकामी वनरक्षक वाई यांचेकडील प्र.गु.रि.क्र.7/2023 नोंद केला.सदर कारवाईत एकुण 6 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदरची कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहा.वनसंरक्षक महेश झांझुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई सौ स्नेहल मगर, वनपाल वाई संग्राम मोरे,वनरक्षक वाई रामेश्वर भोपळे यांनी पार पाडली.