वाई ! भुईंज गावाने घेतला महत्वपूर्ण निर्णय....गावात आता डॉल्बी वाजणारच नाही.. ! ग्रामसभेत पुन्हा एकदा डाँल्बी बंदीचा निर्णय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---
 वाई : प्रतिनिधी 
भुईंज गावचे तात्कालीन सरपंच स्व.बाळासाहेब कांबळे यांचे कार्यकालात भुईंज ग्रामपंचायतीने महाराष्ट्रात प्रथम डाँल्बी बंदी करुन महाराष्ट्रात एक नवा आदर्श निर्माण केला व महाराष्ट्रातील  अनेक गावांनी भुईंज गावचा हा निर्णय आपआपल्या गावात राबवला होता या एका चांगल्या निर्णयामुळे भुईंज गावचा नावलौकिक सुद्धा वाढला होता दरम्यान कोरोना काळानंतर व राजकीय हस्तक्षेपा मुळे पुन्हा डाँल्बीने डोक वर काढलेने भुईंज ग्रामपंचायतीला यासाठी विषेश ग्रामसभा बोलवत डाँल्बी बंदीचा ठराव करवा लागला.
     भुईंज मधील जेष्ठ नागरिकांना  डाँल्बीमुळे होनारा जिवघेना त्रास,घरातील पडनारी भांडी,घरांना पडणार्या भेगा व ज्या लोकांना हार्टचा त्रास आहे त्यांना अक्षरशः बेडरुम किंवा घरामागे असणार्या संडास बाथरुम बध्ये बंद करुन घ्यावे लागत होते तर काहींना डाँल्बी वाजले नंतर दवाखान्यात    अँडमिटच करावे लागले असलेचे सुर ही ग्रामसभेत निघाले.काही दिवसापुर्वी वाई तालुक्याच्या पुर्व भागात आशिच राजकीय वरदहस्तात डाँल्बी वाजली आणी       युवकाला आपल्या प्राणाला मुकावे लागले जर युवकांची अवस्था डाँल्बी मुळे अशी होत आसेल तर आजारी आणी वयोवृद्ध जेष्ठ नागरींकांची अवस्था काय होईल याचा विचारच करायला नको.
    ही डाँल्बी बंदीसाठी घेतलेली विषेश ग्रामसभा सरपंच विजय वेळे यांचे अध्यक्षेखाली घेण्यात आली यावेळी भुईंज ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब कोचळे,उपसरपंच शुभम पवार,शिवसेना शिंदे गटाचे नेते अतुल जाधवराव,तंटामुक्तीचे अध्यक्ष दौलतराव भोसले,शेखरतात्या भोसले,ग्रामपंचायत सदस्य नारायण नलवडे,गजानन तान्याबा भोसले,भरत भोसले,विद्या कुचेकर,प्राजक्ता जाधव,नंदा कांबळे,सुजित जाधवराव, लालासो कांबळे,कुनाल तांबोळी,घनशाम जाधवराव-इनामदार,मारुती गवळी,भुईंज पोलिस स्टेशनचे विजय अवघडे,ग्रामस्थ व महीला यावेळी हजर होत्या.
To Top