बारामती ! होळच्या सरपंच आशा वायाळ यांचा सरपंचपदाचा राजीनामा : 'या' तारखेला होणार नवीन सरपंचाची निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
होळ ता. बारामती येथील सरपंच आशा  विठ्ठल वायाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन सरपंचांची निवड सोमवार ता. १९ रोजी होणार आहे. 
ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक होऊन सुमारे अडीच वर्षाचा कार्यकाळ झाला. अकरा सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत मध्ये दोन सरपंच झाले तिसऱ्यांदा सरपंच निवड होत आहे. एक हाती सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीवर यापुढे कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे प्रत्येकाने सरपंच पदाची इच्छा व्यक्त केल्यामुळे यंदा कोणाची वर्णी लागते याबाबत गावात चर्चा सुरू आहे दरम्यान सदस्यांचे एकमत घडवून सरपंच ठरवणे जिकरीचे होत आहे. 
        उरलेला कार्यकाळ अडीच वर्षाचा असून यामध्ये सर्व इच्छुकांच्या सरपंच पदाच्या इच्छा पुर्ण करण्याची कसरत गट प्रमुखांवर आहे. यावेळी सात सदस्यांनी सरपंच पदाचा दावा केल्यामुळे पेच निर्माण झाला आहे प्रत्येकाने आपल्या पद्धतीने दबाव गट तयार करून गटप्रमुखांकडे मागणी केली आहे. यामधून कोण बाजी मारतो आणि कोण बंड करून उठतो याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क गावातून लढवले जात आहेत.
दरम्यान विरोधी गटांनी थांबा आणि पहा हे धोरण स्वीकारले आहे.
--------------------
To Top