Baramati Breaking ! सचिन पवार ! पोलीसांनाही बांधावे लागले नाकावर रुमाल....! अनेक दिवसांचा अर्धवट सडलेला मृतदेह सापडला..! सुपे परिसरात 'दृश्यम' का?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी गावच्या हद्दीमध्ये अष्टविनायक सुपे- मोरगाव रस्त्याच्या काही मिटर अंतरावर पुणे बिअर कंपनी समोर अनोळखी अज्ञात इसमाचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळला आहे.
        सदर पोलीसामर्फत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास बकरी चराईसाठी मोरगाव सुपा रोडलगत चव्हाणमळ्यामध्ये मेढपाळ गेले असता फिरीस्ती कुत्र्यांचा काही समुह शेतामध्ये अनोळखी देहाबरोबर खेळताना व त्याचे चावे घेताना आढळले ते पाहुन मेढपाळ हे जवळ गेला असता अर्धवट अवस्थेत त्यांना माणसाचा मृतदेह आढळला त्यांनी जमीन मालकाला संपर्क केला व त्वरित तेथील स्थानिक सुपे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सलिम शेख घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला असताना अज्ञात इसमाचा मृतदेह त्यांना आढळला असुन संपुर्ण बॉडी ही पंधरा ते विस दिवसापुर्वीची व  जिर्ण झाल्या कारणाने सद्दस्थितीत त्याचे शवविच्छेदन करत विलेवाट करण्यात आले पोलीस दप्तरी घटनेची नोद घेण्यात आली आहे ,

  पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस टीम करत असुन याठिकाणी बारामती विभागीय आयुक्त आनंद भोंईटे ,उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे , पोलीस निरिक्षक सचिन काळे आदीनी भेट देत पाहणी केली अशी माहीती उपनिरिक्षक सलिम शेख यांनी दिली ,
To Top