सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
धरणाची पाण्याच्या पातळी खाली जाऊ लागण्याने धरणातील मोठे मासे आता मच्छिमारांच्या गळाला लागू लागले आहेत. वीरधरणामध्ये मासेमारी करीत असताना ३५ किलोचा कटला मासा स्थानिक मासेमारी करणाऱ्यांना मिळाला आहे.
सध्या धरणांमध्ये पाणी कमी झालेले आहे तसेच आपल्या परिसरातील ठिकठिकाणी च्या पाण्यामध्ये परदेशी वाणाच्या चिलापी आणि मांगुर माशाच्या प्रजातींचे अतिक्रमण झालेले आहे आणि वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण निर्मिती होऊन धरणे, नदी, नाले आणि ओढे यामधील देशी माशाचे वाण वांब, मरळ, कटला, शिंगटा , खवले, झिंगे आणि खेकडे या माशाच्या प्रजाती आणि इतर जलचर नष्ट होत चाललेले असतानाही काही जुन्या माशांच्या प्रजाती अजूनही तग धरून आहेत हे यावरून दिसून येते.
काल वीर धरणामध्ये टाकलेले जाळी काढण्यासाठी होडीतून स्थानिक मच्छीमार सागर मदने आणि त्यांचे सहकारी आज सकाळी टाकलेले जाळे काढत असताना त्यांना अनपेक्षितपणे हा भला मोठा पस्तीस ते चाळीस किलोचा कटला मासा मिळाला हा मासा सागर मदने यांनी निरा येथील मच्छी मार्केट मधील रोहित सांगळे यांना विकला ही वार्ता परिसरात पसरल्याने हा मासा पाहण्यासाठी व विकत घेण्यासाठी नीरा मच्छी मार्केटमध्ये गर्दी झाली होती.