जावली ! बर्निंग बस बाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली : प्रतिनिधी
धनंजय गोरे 
पुणे बंगलोर आशियाई महामार्गवर अगदी नवीन असणारी बस पेटली जर जिवीत हानी घडली असती तर काय केल असते,ही घटना घडली ती अत्यंत गंभीर असून याबाबतचे सर्व अहवाल सादर करून मला उद्यापर्यंत मिळाले पाहिजेत,अशा सूचना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व राज्य व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना दिले,
    पुणे बंगलोर महार्गावर कोल्हापूर राधानगरी स्वारगेट या विठाई बसने आनेवाडी फाट्यावर असणाऱ्या उड्डाणं पुलावर अचानक पेट घेतला होता, त्यावेळी सुदेवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, बस पुर्ण जळून खाक झाली होती,घडलेली घटना अत्यंत गंभीर असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी त्यांनी सर्व घटनेचा आढावा भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचेकडून घेतला, सर्व प्रवाशांना सुखरूप पुढच्या प्रवासाला पाठवले का अशीही चौकशी केली, यावेळी सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे आणि पालकमंत्री देसाई यांना याबाबत माहिती दिली, विभागीय वाहतूक अधिकारी सौ ज्योती गायकवाड, सुरक्षा व दक्षता अधिकारी शेखर फरांदे,हेही यावेळी उपस्थित होते,
To Top