सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील आमराई भागातील एका जणांच्या घरात गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस व पाच तलवारी मिळून आल्या आहेत. याप्रकरणी बारामती पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
काल दि ११ रोजी रोजी शहर पोलीसाना यांना माहिती मिळाली की वडकीनगर (आमराई) येथील नेहल उर्फ रावण विजय दामोदर वय २३ वर्ष वडकी नगर आमराई बारामती याच्या घरामध्ये गावठी पिस्टल व तलवारी ठेवलेले आहेत अशी माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ सदर इसमाची घरझडती घेण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ पोलीस हवालदार कल्याण खांडेकर पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस शिपाई अक्षय सिताब तुषार चव्हाण दशरथ इंगवले पोलीस हवालदार शिंदे जामदार यांना आदेश दिले आणि घरा मध्ये एक गावठी पिस्तूल व मॅक्झिम एक जिवंत काडतुस तसेच पाच धारदार तलवारी मिळून आल्या. सदर इसमावर भारतीय हत्यार कायदा कलम 3 25 27 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर व्यक्तीला कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे.