फलटण ! पाडेगाव येथे नीरा उजव्या कालव्यात पोहण्यासाठी आलेला १३ वर्षीय मुलगा बुडाला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
पाडेगाव ता. फलटण येथील निरा उजव्या कालव्यात पोहायसाठी आलेला लोणंद येथील एक १३ वर्षाचा मुलगा बुडाल्याची घटना घडली आहे. 
             अनिकेत शंकर पवार वय १३ रा. लोणंद ता.खंडाळा असे कालव्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे. तो सकाळी अकराच्या सुमारास शेजारील एका व्यक्तीसोबत पोहण्यासाठी पाडेगाव येथे नीरा उजव्या कालव्यावर आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
To Top