सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भोर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून पोलिसांकडून बुधवार दि.२८ सायंकाळी पथसंचलन करण्यात आले.
आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी गुरुवार दि-२९ जून आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात तसेच तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परी.पोलीस उपअधीक्षक रेखा वाणी तसेच पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी - ३, पोलीस अंमलदार -२२, होमगार्ड -८ यांनी सहभाग घेवून शहरातील चौपाटी,नगरपालिका चौक,सम्राट चौक येथे बुधवारी पथसंचलन केले गेले.