सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
मुढाळे (ता. बारामती) येथील हायस्कूल ते लोखंडवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेले रस्त्याचे काम संथ गतीने आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी काम मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून चार किलोमीटर रस्त्यासाठी दोन कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले. ३१ ऑगष्ट २०२१ रोजी काम सुरू झाले. वर्षभरात ३० ऑगष्ट २०२२ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. आहे. पण, संबंधित कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी प्रशासन यांच्याकडून काम पूर्णत्वाकडे जाण्यासाठी दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काम रखडलेला अवस्थेत असल्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. किरकोळ कारणावरून दोन वेळा चालू कामातील मशिन अन्य ठिकाणी नेल्याने काम रखडले. पावसाळ्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे जिकिरीचे होणार लोखंडवाडी, जयपत्रेवाडी, थोरात मळा, साळुंके वस्ती जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. संथ गतीने चाललेल्या कामात आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हरकत घेतल्यास काम थांबवले जाते.
अधिकाऱ्यांनी गटानुसार मोजमापे करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे. काम पूर्ण व्हावे, याबाबत संबंधित मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांना ग्रामस्थांनी सूचना करून देखील आहे. कामाची दखल घेतली जात नाही. या रस्त्याची पाहणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली असून सूचना देखील केल्या होत्या.
------------------
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडले काम
हा रस्त्याच्या कामाच्या मंजुरीपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काम रखडत असल्याचा आरोप येथील शेतकरी संग्राम मिंड यांनी केला आहे.