सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर - ७१ तर वेल्हा तालुक्यातील ६१ असे एकूण १३२ पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीचे आरक्षण सोडत कार्यक्रम भोर येथे शुक्रवार दि.३० होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
भोर उपविभागातील भोर,वेल्हे तालुक्यातील रिक्त असलेल्या १३२ गावांमधील पोलीस पाटील पद भरतीचे गावनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम भोर येथे अभिजीत मंगल कार्यालयात शुक्रवार दि-३० रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.तरी गावातील नागरिक लोकप्रतिनिधी,इच्छुक अर्जदार यांनी वरनमूद केलेल्या ठिकाणी व वेळी न चुकता उपस्थित राहावे.सदर सोडत ही एकदाच घेण्यात येणार असून ती या पद भरतीसाठी अंतिम असणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी भोर तसेच तालुका कार्यकारी दंडाधिकारी भोर व वेल्हा यांनी केले आहे.