इंदापूर ! निष्क्रिय आमदार यांनी छत्रपती कारखान्यांमध्ये काय काय भानगडी केल्या त्या लवकरच बाहेर काढणार : गजानन वाकसे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 इंदापूर - प्रणाली देशमुख
निष्क्रिय आमदार हे स्वतः छत्रपती कारखान्याचे चेअरमन असताना त्यांनी काय काय दिवे लावले? हे छत्रपती कारखान्याच्या शेतकऱ्यांना माहित आहे. त्यामुळे निष्क्रिय आमदारांनी दिशाभूल करणारे आरोप करू नयेत अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्रचे  सरचिटणीस गजानन वाकसे यांनी दिला आहे.

           इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यांच्या कामांमध्ये शेकडो कोटी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराची तसेच दर्जाहीन कामांची चौकशी होणार असल्यामुळे, आपले बिंग फुटेल या भीतीमुळे आमदारांची मनस्थिती ढसाळल्याचे दिसून आले. पायाखालची वाळू सरकू लागलेल्या आमदारांनी बेताल वक्तव्ये थांबावीत अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा गजानन वाकसे यांनी दिला.
  
             रस्ते आणि जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी योजनेसाठी आलेला पैसा हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे या पैशाचा विनयोग हा योग्य असाच झाला पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षात या कामांमध्ये घेतलेल्या टक्केवारीची जोरदार चर्चा जनतेमध्ये चालू आहे. त्यामुळे रस्ते व हर घर हर जल योजनांच्या चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे वाकसे यांनी नमूद केले.
 
To Top