वाई ! पोरगा फुल्ल टाईट.. घेतला लोखंडी गज आणि घातला बापाच्या डोक्यात

Admin


 सोमेश्वर रिपोर्टर टीम------

वाई : प्रतिनिधी

वाई तालुक्यातील सुलतानपूर गावच्या हद्दीत लेका ने बापाच्या डोक्यात लोखंडी गज मारून बापास जखमी केल्याची तक्रार वाई पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.   

          पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक २६ रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुलतानपूर गावचे हद्दीत काळुबाई मंदिरासमोर मारुती गुरव फिर्यादी यास त्यांच्या मुलगा शिवलिंग गुरव याने नशेत काही एक कारण नसताना बापाशी भांडण करून शिविगाळ, दमदाटी करून बापाच्या डोक्यात लोखंडी गज मारला त्यास जखमी केले म्हणून त्याच्याविरुद्ध मारुती गुरव यांनी वाई पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून याचा अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.

To Top