इंदापूर ! केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल उद्या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यामध्ये केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती खात्याचे राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या विविध कार्यक्रमांचे सोमवारी (दि.5) आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शनिवारी  दिली. 
            प्रल्हाद सिंग पटेल यांच्या उपस्थितीत  जंक्शन येथे सोमवारी (दि.5) दुपारी 12.30 वा. लघु उद्योजक, व्यापारी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व भाजपचे हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी रवींद्र टंडन हेही या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर दुपारी 1.45 वा. तानाजी थोरात यांची मानकरवाडी येथील निवासस्थानी प्रल्हाद सिंह पटेल यांच्या समवेत बैठक होणार आहे. यानंतर दुपारी 3 वा. प्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते उद्धट प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी घोलपवाडी येथे इंदापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांचेसमवेत केंद्र व राज्य सरकारचे जल मिशनचे अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींची बैठक होणार आहे. प्रल्हाद सिंग पटेल हेच या खात्याचे मंत्री आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये 1335 कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारने हरघर हरजल योजनेसाठी दिला आहे. सदर योजनांमधील त्रुटी व अडचणी संदर्भात बैठकीत चर्चा होईल. इंदापूर तालुक्यामध्ये जल जीवन मिशनची कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी सदर बैठक महत्वाचे असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
_________________________
To Top