थेट वारीतून ! संतोष म्हस्के ! माउलींच्या सोहळ्यात वरूनराज्याचे आगमन : माळशिरस, नातेपुते परिसरात जोरदार पाउस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
माळशिरस : संतोष म्हस्के
 ज्ञानेश्वर माउलींचा नयनरम्य पायी वारी दिंडी सोहळा पंढरपूरकडे सुरू असताना शनिवार दिं.२४ दुपारपासूनच नातेपुते,माळशिरस परिसरात वरूनराज्याने जोरदार हजेरी लावली असून वारकरी ओलेचिंब होऊन भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या नामाचा जयघोष करीत सोहळ्यात रमून गेले होते.
    पुणे, सातारा,सोलापूर जिल्ह्यात पाउसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा पाऊसाच्याआगमनाने सुखावला असून लवकरच खरिपातील पेरण्या सुरू होण्याचे चित्र आहे.शनिवार दि.२४ दुपारच्या दरम्यान माळशिरस परिसरात पोहोताच पाऊसाने जोरदार सुरुवात केल्याने वारकऱ्यांना ओलेचिंब होऊन दिंडी सोहळ्यात पंढरपूरकडे मार्गस्थ व्हावे लागले.
To Top