बारामती ! ज्या चौकात लहानपणी मामांबरोबर फिरायचे...त्याच चौकात ग्रामस्थांच्या सत्काराने आमदार रवींद्र धंगेकर भारावले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुण्यातील कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत विजयश्री खेचत आणत आमदार रवींद्र धंगेकर यांनी सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. आज आमदार धंगेकर यांचा सत्कार कर्चेवाडी व करंजेपुल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सोमेश्वरनगर परिसरातील लहानपणीच्या जुन्या आठवणींना आमदार रवींद्र धंगेकर यांनी उजाळा दिला.
          बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील सोरटेवाडीमधील कर्चेवाडी ही अवघी चाळीस घरांची वस्ती म्हणजे रवींद्र धंगेकर यांचे आजोळ. रवींद्र धंगेकर यांचे आजोबा दिनकर कर्चे यांना भगवान, दिगंबर, माऊली, पांडुरंग व सुलाबाई अशी पाच अपत्ये होती. 
या आजोळात ते राहिल्याने त्यांचा सोमेश्वरनगरसह होळ, करंजेपुल, करंजे या भागात जनसंपर्क. त्यामुळे कसब्यातील विजयाचा आनंद कसब्यातील मतदारांसोबत होळ-करंजे परिसरातील जनतेनेही फटाके फोडून साजरा केला होता. 
          आज ग्रामस्थांच्या वतीने आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोमेश्वर चे संचालक ऋषि गायकवाड, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, मनोहर कारंडे, पंडित होळकर, एकनाथ होळकर, राजेंद्र होळकर, निलेश गायकवाड, सागर गायकवाड, सचिन कारंडे, सुमित भोसले, माऊली शिंदे, संजय गायकवाड, सचिन गायकवाड, संभाजी गायकवाड,जमीर शेख, रामराजे राजवडे, नितीन साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top