सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : चंद्रकांत भाट
रोटरी क्लब ही जागतिक सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्याचे आदर्शवत काम सुरू आहे आपल्या परिसरातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्या वेळेत शाळेत जावेत यासाठी सायकल वाटप करण्यात आले आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील( माऊली) यांनी केले
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यावतीने विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले याप्रसंगी संजय पाटील बोलत होते रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हरीस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रोटरी हेरिटेज सिटीचे अध्यक्ष नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये वर्षभरातील कामाचा आढावा घेत राबवलेल्या उपक्रमाची माहिती देऊन यापुढेही क्लबच्या माध्यमातून सामाजिक काम अविरतपणे सुरू राहील गरजूंना मदतीचा हात दिला जाईल असे आश्वासन दिले क्लबच्या वतीने वाढदिवसानिमित्त संजय पाटील (माऊली) यांचा सत्कार करण्यात आला रोटरी हेरिटेज सिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले
यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सचिव संजय तुकाराम शिंदे ट्रेझरर तुकाराम पाटील सदस्य संजय रामचंद्र शिंदे राहुल यादव संजीव पुजारी आप्पालाल चिकोडे प्रा काशिनाथ भोसले परशुराम चव्हाण विराजसिंह यादव उल्हास पाटील विवेक फल्ले भरत गावडे अमोल चव्हाण राहुल माने संदीप कांबळे सुभाष भंडारे शरद उर्फ बापू मोरे रणजीत जगदाळे यांच्यासह अमोल पाटील धनाजी आवळे प्रल्हाद भोसले संतोष गायकवाड विनोद मुळीक आदीसह विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन चंद्रकांत भाट यांनी केले