बारामती ! करंजेपुल येथे चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे सोमेश्वर देवस्थान रस्त्यावरील काल रात्री चोरट्यांनी छताचा पत्रा उचकटुन दुकानात प्रेवेश करत १५ हजारांची रोकड लंपास केली. 
              रात्री ३ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली, यामध्ये संतोष सोनवणे यांच्या मालकीचे प्रशांत ट्रेडर्स, कुणाल जगताप यांच्या मालकीचे अलोक इलेक्ट्रॉनिक तसेच शेतकरी मेडिकल ही तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. यामध्ये प्रशांत ट्रेडर्स यांचे साडेसात हजार तर अलोक इलेक्ट्रॉनिक यांचे साडेआठ रुपये चोरीला गेले आहेत. घटनास्थळी करंजेपुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शेलार, पोहवा.अमोल भोसले, महादेव साळुंखे व रमेश नागटिळक यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
To Top