सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुणे - मिरज रेल्वेमार्गावरील नीरा रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, नीरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे काम त्वरित पूर्ण करावे तसेच नीरा रेल्वे स्थानकातून पुण्याकडे जाणा-या रेल्वे गाड्या पुर्वीप्रमाणे जुन्याच प्लॉटफॉर्मला थांबवाव्यात अशा विविध मागण्यां साठी नीरा व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी (दि.६) सकाळी साडेआठ वाजता रेलरोको आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात प्रवाशांसह , ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीन - वास्को ही गोवा
एक्सप्रेस , मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ,
यशवंतपूर - बँगलोर संपर्क क्रांती एक्सप्रेस, चंदीगढ- यशवंतपूर ही चंंदीगढ एक्सप्रेस, बँगलोर - अजमेर एक्सप्रेस , कोल्हापूर अहमदाबाद या लांब पल्ल्याच्या गाड्या ये - जा करीत असतात.माञ या गाड्यांना पुणे रेल्वे स्थानकानंतर सातारा येथील रेल्वे स्थानकांवरच थांबा आहे.
रेल्वे प्रशासनाने ६ जुन पासून पुणे - मिरज ही साप्ताहिक विशेष सुपरफास्ट रेल्वे गाडी सुरू करीत आहे.या एक्सप्रेसला जेजुरी नंतर लोणंद रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलेला आहे. परंतू या साप्ताहिक एक्सप्रेसला नीरा रेल्वे स्थानकांत थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे नीरा रेल्वे स्थानकांत लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा , नीरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे काम त्वरित पूर्ण करावे, तसेच पुणे, मुंबईकडे जाणा-या रेल्वे गाड्या पु्र्वीप्रमाणेच जुन्या प्लॉटफॉर्मला थांबवाव्यात अशा विविध मागण्यां साठी नीरा व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी ( दि.६) सकाळी साडेआठ वाजता
नव्याने सुरू होणा-या पुणे- मिरज या साप्ताहिक
विशेष सुपर फास्ट रेल्वे गाडीसमोर नीरा रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन ग्रा.पं.सदस्य प्रमोद काकडे, बाळासाहेब साळुंखे , अमीर मणेर , सामाजिक कार्यकर्ते टी.के.जगताप, सुधीर शहा , सचिन मोरे आदींनी नीरा रेल्वे स्टेशन मास्टर यांना दिले. तसेच मध्य रेल्वेचे डिव्हीजनल मँनेजर यांना देखील निवेदन देण्यात आल्याचे प्रमोद काकडे यांनी सांगितले.