बारामती ! कोऱ्हाळे नजीक माळशिकारेवाडीच्या दोन शेतकरी भावंडांची कमाल...! वीस गुंठ्यांत भेंडीतून मिळवले तब्बल साडेतीन लाखांचे उत्पादन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
को-हाळे बुद्रुक नजीक माळशिकारेवाडी येथील शेतकरी शंकर आप्पासो माळशिकारे व शरद आप्पासो माळशिकारे या दोन बंधूंनी अवघ्या २० गुंठे शेतीत भेंडीतून तब्बल साडेतीन लाखांचे उत्पादन घेतले आहे. 
        बारामती तालुक्यातील 
को-हाळे बुद्रुक नजीक  माळशिकारेवाडीत म्हटलं की शेतकरी वर्ग त्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे त्या तरुणांमध्ये शंकर आप्पासो माळशिकारे व शरद आप्पासो माळशिकारे या दोघे बंधूंनी जे कृषी विभागाला जमलं नाही ते या दोन बंधूंनी बारामती तालुक्यात आगळावेगळा प्रयोग करून भेंडीचा यशस्वी प्रयोग केला की भेंडीच्या शेतामध्ये जर आपण एकदा भेंडी लावली तर त्या रानामध्ये दोन वर्षानंतर ते पिक घेता येते परंतु या दोन बंधूंनी विचाराच्या जोरावर भेंडीच्या रानामध्ये भेंडी असताना ती जुनी भेंडी काढून त्याच रानामध्ये नवीन भेंडीचे पीक यशस्वीरित्या आणले. 
       भेंडी काढून जो प्रयोग आज पर्यंत कोणालाही जमला नाही ती या दोन बंधूंनी भेंडी लावून त्याची व्यवस्थित जोपासणी करून आज ती उभी केली आहे रानामध्ये त्या दोन बंधूंच्या  विचारांच्या कष्टामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खूप  मोठा फायदा होणार आहे कारण हा आदर्श महाराष्ट्रामध्ये प्रथमच माळशिकारे वाडीत मधील दोन भावांनी घेतला आहे. आणि त्याच रानामध्ये पहिल्या भेंडीचे शंभरच्या पुढे तोडे तोडले आहेत.
To Top