पुरंदर ! विजय लकडे ! चोवीस तासात 'ते' खातात फक्त एक शेंगदाण्याचा लाडू व एक केळी...! निरेतल्या ८२ वर्षाचे 'शांती'मामांचा गेल्या वीस वर्षांपासून दिनक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर ‌‌टीम---- ‌‌
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा व निरा परिसरात कुतूहलाचा विषय ठरलेले शांती मामा नावाने परिचित असलेले शांतीलाल सखाराम शहा वय ८२ हे तरुण गृहस्थ ...तरुण या अर्थाने कारण वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांची शारीरिक हालचाल तरुणांना लाजवेल अशीच आहे.    
         नीरा मध्ये मनोज जनरल स्टोअर्स दुकानाचे स्वतः मालक असून या वयातही शांतिमामा दुकानाचा सर्व कारभार पाहतात पूर्वी त्यांचे स्वस्तिक प्रिंटिंग प्रेस नावाचे छपाई दुकानाचा व्यवसाय होता. सद्या ते जनरल स्टोअर्स चे दुकान चालवतात.  
गेली वीस वर्षे त्यांची दिनचर्या म्हणजे पहाटे सहा उठणे, सकाळी सहा वाजता उठून दुकानासमोरील पटांगणाची स्वच्छता व दुकानातील वस्तूंची स्वच्छता ते स्वतः करतात.   
त्यानंतरचा दिनक्रम सकाळी दहा बारा वाजता अंघोळ करून देवदर्शनाला जातात त्यानंतर आहारात एक शेंगदाणा लाडू व एक केळी एवढाच  आहे. सायंकाळी सहा वाजता अर्धा कप चहा त्यानंतर रात्री कुठलाही आहार घेत नाहीत अख्खा दिवस व रात्र ते शेंगदाणा लाडू व एक केळीवर काढतात. १९६३ ते १९७५ च्या दशकात ते शंभर किलोमीटर सायकल चालवायची दुकानाच्या व्यवसायानिमित्त शेरेचीवाडी, दहिगाव, नातेपुते,बारामती ते निरा असा त्यांचा सायकल प्रवास असायचा
वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवेल असाच आहे. 
शांती मामा सांगतात गेल्या वीस वर्षात आजारी पडलो असा विषयच नाही. एकदाही दवाखान्यात गेलो नाही. अजूनही या वयात पंधरा ते वीस किलोमीटर चालतो.
To Top