सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी. मार्च २०२३ परीक्षेत नेरे ता.भोर येथील पंचक्रोशी आदर्श विद्यालयाने उत्कृष्ट १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यात एकमेव स्वामी विवेकानंद संस्थेचे गेले पन्नास वर्षांपासून पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे आहे.विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन शासकीय नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहेत.२०२३ च्या दहावीच्या परीक्षेत प्रथम संस्कृती संतोष किंद्रे(९५%), द्वितीय श्रुती कालिदास भिलारे (९१%) तर तृतीय पूनम विलास दीक्षित (९०%) या विद्यार्थिनींचे क्रमशः नंबर आले आहेत. विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागल्याने ग्रामस्थ,तरुण मंडळ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.