Wai Breaking ! 'त्या' तिघी बसची वाट पाहत उभ्या होत्या...एक सुसाट टँकर येतो आणि तिघींना उडवतो : दोन ठार एक जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
आनेवाडी टोलनाक्यावरून बेळगावकडे निघालेल्या टँकर चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. महामार्गालगत वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन महिलांसह मुलीला या टँकरने उडविल्याने दोन महिला जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाली आहे.                   याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुणे बंगलोर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याजवळ एक टँकर सातारा बाजूकडे निघाला असताना टॅंकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गालगत उभ्या असलेल्या दोन महिला व एका मुलीला या टँकरने उडविल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत, तर तिसरी महिला गंभीर जखमी झाली.  लयांची नावे मात्र समजू शकली नाहीत. तर सायली दिलीप कांबळे हि मुलगी जखमी झाली आहे. त्यांना अधिक उपचासाठी सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गाचे पोलीस उप निरीक्षक घनवट व इतर महामार्ग पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमींना सातारा येथे उपचारासाठी पाठवून दिले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झालीय.
To Top