सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी
धनंजय गोरे
ज्ञानदानाचे पवित्र काम करणारा शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो त्याची निवृत्ती ही एक कायदेशीर प्रक्रिया असते खर तर त्यांच्या प्रदीर्घ शिक्षकी अनुभवाचा फायदा समाजाला आणि विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचा असतो सुरेश शेलार गुरुजींनीही आपल्या अडतीस वर्षाच्या शिक्षकी सेवा काळात अनेक नामवंत विद्यार्थी घडवले,शाळांचा विकास केला,विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्याला तसा वाव देण्याचे काम केले निवृत्तीनंतर ही त्यांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी घडवण्यासाठी करावा शेलार गुरुजींचे शिक्षणातील योगदान लाख मोलाचे असून इतरांना आदर्शवत आहे असे प्रतिपादन आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले
जि प मेढा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेलार यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आ शिवेंद्रसिंहराजे बोलत होते यावेळी माजी मंत्री आ शशिकांत शिंदे माजी आ सदाशिवराव सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी शिक्षणसभापती अमितदादा कदम,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, शिक्षक समितीचे राज्यनेते उदय शिंदे, निवृत्त शिक्षण संचालक हनुमंतराव जाधव ,नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, उद्योजक विजय शेलार, आनंदराव जुनघरे,माजी नगराध्यक्ष अनिल शिंदे,नगरसेवक शशिकांत गुरव, विकास देशपांडे ,माजी पंचायत समिती सदस्य विजय सुतार,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने,रामभाऊ शेलार, व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संदीप जवळ, एकनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते
आ शशिकांत शिंदे म्हणाले शेलार गुरुजींचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असून त्यांनी ज्या ज्या शाळेवर काम केले त्या त्या शाळांचा नावलौकिक झाला मेढा शाळेतील तेरा वर्षाच्या कार्यकाळात शेलार गुरुजींनी अत्यंत चांगले काम केले शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा, शैक्षणिक गुणवत्ता,पटसंख्या,क्रीडा आदी क्षेत्रात मेढा शाळेला मोठा नावलौकिक झाला तालुका व जिल्हा पातळीवर प्रत्येक स्पर्धेत मेढा शाळेतील विद्यार्थी चमकले मेढा शाळेची नवीन वास्तू निर्माण करण्यासाठी शेलार गुरुजींनी मोलाचे प्रयत्न केले तसेच त्यांनी विद्यार्थी, पालक,शिक्षक व ग्रामस्थ असा समन्वय साधून शाळेचा विकास केला शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही असाच व्हावा
यावेळी माजी आमदार सदाशिवराव सपकाळ,वसंतराव मानकुमरे,उदय शिंदे,ज्ञानदेव रांजणे,हणमंतराव जाधव,शशिकांत गुरव,संजय आटाळे,नारायणराव शिंगटे,संजय गाडे,बळवंत पाडळे आदींनी आपल्या भाषणातून शेलार गुरुजींच्या कार्याचा गौरव केला शशिकांत शेलार यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव जुनघरे यांनी केले तर आभार विजय जुनघरे यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक संघ,शिक्षक समितीचे पदाधिकारी, शिक्षक बँकेचे आजी माजी संचालक,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, तालुक्यातील सर्व शिक्षक,शिक्षिका, मेढा व ओखवडी ग्रामस्थ, व्यवस्थापन कमिटीचे सदस्य,भैरवनाथ युवा क्रीडा मंडळ व व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते,परिसरातील सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते