सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : प्रतिनिधी
आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीने नव्या जुन्या आठवणी जाग्या होताना, आपल्याच वर्गातील अडी अडचणीत असलेले व दिवंगत झालेल्या मित्रांच्या मदतीसाठी पाऊल उचलून अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्ब्ल 28 वर्षानी भेटलेल्या सहकाऱ्यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी जुळून आल्या,
नवमहाराष्ट्र विद्यालय शिवनगर रायगाव ता जावली येथील 1995च्या इयत्ता 10 वीच्या विध्यार्थी विध्यार्थिनीचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी शिक्षकांच्या अनुपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात गुरुजनानी दिलेल्या संस्कारांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करताना, अत्यंत नेटक्या नियोजनात पार पडलेल्या या मेळाव्यात, प्रथम आपल्या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञता व्यक्त केली, त्यानंतर उच्च पदावर विविध ठिकाणी काम करनारे व आपल्या राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींचा सन्मान करून,शाळेसाठी आपण देणगी देतोच,पण आपल्यापैकी दिवंगत झालेल्या आपल्याला सख्या सोबत्यांना व आजही आर्थिक विवंचणेत असलेल्या आपल्या मित्र मैत्रिणीच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सर्वांनी मिळून करण्याचा आगळा वेगळा संकल्प करण्याचे यावेळी ठरले,आता आपण कायम एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे वचन घेताना हे ऋणानुबंध जीवात जीव आहे तोपर्यंत ठेवत अशाच पद्धतीने एक कुटुंब म्हणून एकमेकांच्या पाठीशी राहण्यासाठी हे सखे सोबती पुढे आले आहेत,
यावेळी हेमा शिवणकर,राखी गोरे, कुसुम सुतार, अर्चना महाडिक, अनिता सोनावणे,राजश्री फरांदे, वैशाली फरांदे, शैलजा माने, नीलम देशमाने, संग्राम शिंदे, गणेश पवार, दत्ता जगदाळे, मनोज पवार, मोहन धुमाळ,माधुरी सोनावणे, रोहिणी दीक्षित, बाळुताई फरांदे, वनिता सोनावणे,राजेश फरांदे,दिनेश शिंदे,उमेश कुलकर्णी, रविंद्र धुमाळ, खंडेराव नांगरे,अजित चव्हाण, संतोष जाधव, राहुल सोनटक्के,बाळकृष्ण फरांदे, प्रशांत गुजर, राजेंद्र सोनावणे,सचिन सोनावणे,इरफान शेख, विक्रम फरांदे,राजेंद्र बोराटे,दीपक फरांदे, संदीप गायकवाड, सिताराम शिवनकर, प्रवीन शिवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
इतक्या वर्षानी आम्ही भेटलो आहे त्यामुळे आमच्यापैकी काहीजण स्वर्गवासी झाले आहेत, तर काहीजण अजूनही अडचणीत आहेत त्यांना लागेल ती मदत करून आम्ही आमचा मैत्रीचा धर्म आम्ही पाळणार आहोत,आमच्या या संकल्पासाठी आमचे शिक्षक देखील आमच्या पाठीशी उभे आहेत.
COMMENTS