जय हो...! नीरा व परिसरातील ग्रामस्थांच्या आंदोलन यश : अखेर नीरा स्थानकावर थांबली पुणे-मिरज सुपरफास्ट एक्सप्रेस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा व परिसरातील ग्रामस्थांनी केलेल्या विविध मागण्या रेल्वे प्रशासनाने मान्य कराव्यात या करिता  मंगळवारी         ( दि.६) रेलरोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. माञ रेल्वे प्रशासनाने संयमाची भुमिका घेत नव्याने सुरू झालेली  पुणे - मिरज ही सुपरफास्ट गाडी नीरा रेल्वे स्थानकात सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी आल्यानंतर थाबविली. यामुळे आंदोलकांनी रेल रोको न करता आंदोलन यशस्वी केले.

             पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रेल्वे स्थानकावरून जाणा-या व येणा-या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह  मंगळवार ( दि.६ ) पासून पुणे - मिरज ही साप्ताहिक  विशेष सुपरफास्ट रेल्वे
गाडीला नीरा रेल्वे स्थानकांत थांबा देण्यात यावा.
नीरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे काम त्वरित पूर्ण करावे, तसेच  पुणे, मुंबईकडे जाणा-या रेल्वे गाड्या  पु्र्वीप्रमाणेच नीरा रेल्वेस्थानकातील 
जुन्या प्लॉटफॉर्मवर थांबविण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी नीरा व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी ( दि.६) सकाळी साडेआठ वाजता नव्याने सुरू झालेल्या पुणे- मिरज या साप्ताहिक विशेष सुपर फास्ट रेल्वे गाडीसमोर नीरा रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
          रेल्वेचे पुणे विभागाचे अप्पर रेल प्रबंधक यांनी पुढील आठवड्यापासून नीरा रेल्वे स्थानकांवर पुणे - मिरज एक्सप्रेस रेल्वेला दोन मिनिटांचा थांबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच नीरा स्थानकातून पुण्याकडे जाणा-या रेल्वे गाड्या पुर्वीप्रमाणे जुन्या प्लॉटफॉर्मला थांबविण्याबाबत ,  लांब पल्ल्याच्या सुपर फास्ट रेल्वे गाड्यांना  नीरा स्थानकांवर दोन मिनिटांचा थांबा मिळावा यासाठी मुंबईतील रेल्वे मँनेजर यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे ग्रा.पं.सदस्य प्रमोद काकडे यांनी सांगितले.      
          नीरा व परिसरातील  ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे जीआरपीचे पोलिस उपअधिक्षक महेश दिवेकर,आरपीएफचे निरीक्षक अजित माने  नीरेचे फौजदार नंदकुमार सोनवलकर व यांच्यासह  रेल्वेचे दोन पोलिस निरीक्षक, तीन सहा.पोलिस  निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक, वीस पोलिस कर्मचा-यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने नीरा रेल्वे स्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. 
 
    नीरा ग्रा.पं.सदस्य प्रमोद काकडे, बाळासाहेब साळुखे , अमीर मणेर , संतोष मोहिते, सामाजिक कार्यकर्ते टी.के.जगताप, सुधीर शहा ,सचिन मोरे आदींनी विविध मागण्यांचे निवेदन नीरा स्टेशन मास्तर महेशकुमार मीना यांना दिले होते.
      दरम्यान, अप्पर रेल प्रबंधक बी.के.सिंग यांनी 
यांनी पुणे - मिरज ही साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वे गाडी पुढील मंगळवारपासून नीरा रेल्वे स्थानकात थाबण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी रेल्वे रूळावर न जाता आंदोलन यशस्वी केले. आंदोलकांच्या वतीने अनिल चव्हाण यांनी रेल्वेच्या ड्रायव्हरचा सत्कार केला. यावेळी नीरा व परिसरातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
---
To Top